कडकनाथ कोंबड्याचे कालवण/KADAKNATH KOMBDYACHE KALWAN MARATHI FOOD RECIPE



KADAKNATH CHICKEN LOST RECIPE click on below link for recipe
https://www.youtube.com/watch?v=mHwSZrhbYT8

देशी कोंबडा न खाल्लेला नॉनव्हेजकर सापडणे तसा कठीणच
पण पैजेवर सांगतो जवळ जवळ ९९% खव्व्ययांनी कडकनाथ कोंबडा पाहीलाही नसेल.
प्रोटिन्स मध्ये इतर कोंबड्यांपेक्षा उजवा .औषधी असलेला,आणि विशेष mhnje
कोंबडा प्रजाती मध्ये सर्वात कमी कोलोस्ट्रअल असलेला हा कडकनाथ कोंबडा.
एकतर हा राजघराण्यांच्या shahi स्वयंपाक घरात दिसायचा किंवा आदिवासी आणि फासे पारधी समाजाच्या खुराड्यात असा हा बहुगुणी आणि अप्रतिम चवीचा कडकनाथ कोंडा ,एकदातरी चाखावा
कडकनाथ कोंबड्याचे कालवण करण्यासाठी आप्ल्यालाल लागेल
१ किलो कडकनाथ कोंबडा ,२ चमचा आलं लसणाची पेस्ट, २ मोठे कांदे, ३ चमचे घाटी मसाला , २ चमचा धने जिरे पूड १ १ चमचा हळद , चावी पुरत मीठ आणि फोडणीसाठी तेल
व वाटाणा साठी सुक्या खोबऱ्याची पाव वाटी ३ ते ४ सुक्या लाल मिरच्या शक्यतो लवंगी मिरची , ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या , आल्याचा लहान तुकडा कोथिंबीर, ३ लवंग, , ५काळीमिरी, एक दालचिनीचा तुकडा १ चमचा धणे आणि एक चमचा जिरे
सर्वप्रथम वाटण तयार करून घ्या
मग कोंबड्याचं मटण स्वच धुऊन घ्या
मग त्यावर हळद मीठ व धने जिरे पूड आले लसणाची पेस्ट व आपण तयार केलेलं वाटण लावून घ्या
व मसाल्यात हा कोंबडा र्ध तास मुरू द्या
अर्ध्या तासानंतर पातेल्यात तेल तापवा व त्यात जाडसर चिरलेला कांदा घाला या परतून घ्या
वरून यात आला लसणाची पेस्ट घाला
कांदा छान सोनेरी रंगावर भाजत आला कि मग यात मुरवत ठेवलेलं कोंबड्याचं मटण घाला व छान परतून घ्या
मसाल्याला तेल सुटे पर्यंत मटण माध्यम आचे वर परतत राहा
साधारणतः ५ मिनिट परतल्या नंतर मसाल्याची परात यावर झाका व त्यात २ ग्लास पाणी ओता
पाण्याला वाफ आली मसाल्याचे हेच पाणी कालवणात घाला व मटण शिजू द्या
आणखीन ५ मिनिटांनी यात पुन्हा पाणी वाढवाया कालवणाचा रस्सा जास्त असतो म्हणून यात पाणी जास्त घाला
बॉयलर चिकन पेक्षा या कडकनाथ कोंबड्याला शिजायला जास्त वेळ लागतो
साधारणतः ४० मिनिटात कालवण तयार होईल
गरज वाटल्यास यात मीठ घाला
आणि रश्श्यावर भुरका मारा

Comments