Filter Coffee Marathi Recipe
फिल्टर कॉफी
बाबा बूदान यांनी जर १६ व्या शतकात चोरून ७ कॉफीच्या बिया दक्षिण भारतात आणल्या नसत्या तर कदाचित इतिहास एका महान कॉफी पासून वंचित राहिला असता.
जगभरात पसरलेल्या दक्षिण भारतीय समाज एकवेळ अन्नाशिवाय राहू शकेल पण कॉफीशिवाय राहणे म्हणजे महापापम .
आजकालची पिढी तर कॅपुचिनो नावाच्या १०० रुपयांच्या मग वर खुश होते पण माटुंग्याच्या मद्रास कॅफे ची फिल्टर कॉफी मित्रांसोबत उभे राहून पिण्याची लज्जत काही औरच.जगभरातल्या अव्वल दर्जाच्या दहा कॉफे मध्ये आपल्या फिल्टर कापी चा नंबर येतो.
तर आज त्याच नजाकतीसह बनवूया आपली सर्वांची लाडकी फिल्टर कापी
फिल्टर कॉफी बनवण्यासाठी आपल्याला लागेल
एक थंडीतली सुंदर सकाळ
एक कॉफीचा फिल्टर
४ चमचे प्रसिद्ध चिकोरी कॉफी
२ कप मस्त वाफाळलेले दूध
अर्धा ग्लास पाणी
आणि आपल्या आवडी प्रमाणे साखर
सर्व प्रथम एक छोटे से पातेले तापवत ठेवा
मग यात अर्धा ग्लास पाणी घाला व उकळून घ्या
पाणी उकल पर्यंत कॉफी फिल्टर घ्या
व यातील वरील भागा मध्ये ४ चमचे कॉफी पावडर घाला
आता कॉफी पावडर वर फिल्टर ची जाळी ठेवा
व वरून यात थोडं थोडं करून उकळत पाणी घाला
अगदी सर्व पाणी ओतू नका कॉफी पावडर मध्ये मुरेल इतकाच पाणी गरम पाणी आत घाला व वरून झाकण लावून घ्या
आता साधारणतः १० मिनिट ते अर्धा तासाच्या आत या फिल्टर मधून कॉफी झिरपत राहील
थेंबे थेंबे कॉफी चे तळे साचेल
कॉफी चा हा अर्क खालील भांड्यात जमा होत राहील
१५ ते २० मिनिटानंतर एका पातेल्यात दूध तापवायला ठेवा
वरून दुधात साखर मिसळा
आणि दूध तापू द्या
तापलेल्या दुधात कॉफीचा अर्क ओता आणि काही सेकंद शिजू द्या
आता हि तयार झालेली कॉफी घरातल्या अनुभवी हातामध्ये जाऊद्या आणि लांब लचक धार काढून फेसाळून घ्या
तयार कॉफी टिपिकल दक्षिण भारतीय tumbler आणि डा ब रा मध्ये ओता
तयार झाली फिल्टर काफी
Comments
Post a Comment