Posts

Showing posts from December, 2017

चिकन पहाडी कबाब | Pahadi Chicken Kebab Marathi Recipe

Image
याला पहाडी टिक्का किंवा पहाडी कबाब का म्हणतात माहित नाही ,पण याची चव आणि हिरवा रंग मस्तच . बनवायला फार सोपा आणि कमीत कमी जिन्नस टाकून बनवलेला पहाडी चिकन टिक्का चला तर मग पहाडी चिकन टिक्का बनवण्यासाठी आपल्याला लागेल पाव किलो बोनलेस चिकन एक वाटी कोथिंबीर अर्धी वाटी पुदिना पुदिना ६ ते ७ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आलं लसणाची पेस्ट एक चमचा हळद अर्धा लिंबू चवीपुरते मीठ आणि गरजेनुसार तेल व बटर सर्वप्रथम चिकन व्यवस्थित धुवून आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुकडे करून घ्या मग त्यावर मीठ ,हळद,हिरवे वाटण,आले लसूण वाटण टाका ,आणि अर्धा लिंबू पिळून घ्या मग ते मिश्रण चांगले एकजीव करा ,चिकन टिक्का या मसाल्यात चांगला घोळवून घ्या. मग हे मिश्रण कमीत कमी ४ तास मुरू द्यात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तंदूर लावून कोळसा चांगला पेटू द्यावा मग तंदूर च्या सळया किंवा आजकाल बाजारात लाकडी skewer मिळतात तेघ्या व चिकन चे तुकडे या सळया मधे खुपसून तंदूर मध्ये भाजायला ठेवा५ मिनिट प्रेहेत केलेल्या ओव्हन मध्ये तुम्ही हे कबाब १८० डिग्री सेल्सियस वर १५ ते १८ मिंट ग्रिल करू शकता Preheat the oven at ...

पत्थर का गोश्त।दगडी कबाब | Patthar Ka Gosht | Dagdi Kebab Marathi Recipe

Image
निज़ाम शिकरीला गेला असताना त्याचा खानसामा जेवणाची भांडी न्यायला विसरला आणि मग तेंव्हा त्याने निजामाला शिकारीचे मटण दगडावर भाजून खायला दिले होते अशी एक कहाणी आहे. उत्तर भारतात सुद्धा हां दगडावरचा कबाब फार प्रसिद्ध आहे त्याच्या वेगळ्या चवीसाठी। मसाले सर्व तेच पण दगडावर भाजल्याने चव काहीतरी वेगळीच आणि मस्त लागते , तर आज खास तुमच्यासाठी being मराठी घेऊन आलय दगडी कबाब म्हणजे पत्थर का गोश्त आणि तेहि आपल्या घरात. दगडी कबाब बनवण्यासाठी आपल्याला लागेल पाव किलो बोनलेस मटण दोन चमचे घाटी मसाला अर्ध चमचा हळद चवी पुरत मीठ अर्ध लिंबू चिरलेली कोथिंबीर गरजेनुसार तेल आणि एक दगडाची लादी सर्व प्रथम वाहत्या पाण्यात मटण स्वच्छ धुऊन घ्या धुतलेल्या मटणाचे पातळ काप करून घ्या चिरलेले काप एका परातीत काढून घ्या व मग यावर मीठ हळद घाटी मसाला लिंबाचा रस आणि कोथीमिर लावा आणि छान एकजीव करून घ्या साधारणतः १/२ तास तरी मटणाचे हे तुकडे या मसाल्यात मुरू द्या या नतर गॅस वर दगडाची लादी तापवयाला ठेवा दगडाची लादी वर पाण्याचा हबका मारून त्याचे तापमान सेट करा मग तापलेल्या लादीवर थोडं थोडं ते...

Patthar Kebab Dagdi Kebab Marathi Recipe

Image

खिमा समोसे / Qeema Samosa Marathi Recipe

Image

झटपट स्ट्रॉबेरी जाम |Easy instant Strawberry Jam Marathi Recipe

Image
एक काळ होता ज्यात किसान जाम ने धुमाकूळ घातला होता आणि त्या आय लव्ह सील जॅम्स ची ऍड तर क्या कहने त्यातला त्यात फळांचा गर असलेला जाम मात्र फक्त महाबळेश्वर लाच मिळायचा महाबळेश्वर आणि स्ट्रॉबेरीज च आणि वर्षातून एकदा तरी तो आपल्या घरी यायचा पण हा जॅम बनवणे फार सोपे आहे तर आपण बनवूया स्ट्राबेरी जाम स्ट्रॉबेरीज जॅम बनवण्यासाठी आपल्याला लागेल १/ २ किलो स्ट्रॉबेरी ३०० ग्राम साखर ३ कप दालचिनी चा १ इंच हा तुकडा अर्धा लिंबू सर्व प्रथम स्ट्रॉबेरी वाहत्या पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या मग याची देठ चिरून घ्या व याच्या ४ फोडी करून घ्या चिरलेल्या स्ट्रॉबेरीज तापलेल्या पण मध्ये घाला वरून साखर घाला आणि १ १/२ ग्लास पाणी घाला व मंद याचे वर या स्ट्रॉबेरीज शिजू द्या साधारणतः ५ मिनिटांनंतर यात दालचिनीचा तुकडा घाला व लिंबू पिळा आणि झाकण लावूंन जाम शिजू द्या ३० ते ४० मिनिट तरी स्ट्रॉबेरी शिजायला वेळ लागेल या दरम्यान सतत ढवळत राहा जो पर्यंत घट्ट होत नाही तो पर्यंत हे मिश्रण शिजू द्या ४५ मिनीनातांतर आप्ल्यालाल जो घट्ट पणा हवा आहे तो मिळेल एका प्लेट वर या सिरप चे काही थेम्ब ओता जर ते ओ...

Gingerbread Cookies Christmas Special Marathi Recipe

Image
आठवतात का तुम्हाला १० पैश्याची पाच, बारीक गोल बटणासारखी दिसणारी बिस्किटे,  नक्कीच खाल्ली असतील आणि चव अजूनही मनात खोलवर दडून बसली असणार . आई बरोबर वाण्याच्या दुकानात सामान उचलायला जावं लागलं  कि त्याचं बक्षीस  असायची ती १० पैशाची बिस्कीट अद्भुत आणि अपूर्व चवीच्या जिंजर कुकीज बनवल्या तेंव्हा कळलं नाही कि हि तीच बिस्कीट आहेत पण जेंव्हा चाखली तेंव्हा झटकन अगदी बालपणात घेऊन गेली आणि ती आठवण डोळ्यावाटे वाहू लागली . हो त्या जिंजर कुकीज च होत्या . एरवी ख्रिसमस शिवाय याकडे कुणी ढुंकून हि  पाहत नाही. पण आज गर्वाने सांगते कि  बालपणी आपण ती रोज खात होतो . तर चला आज बनवायची आहे आणखीन एक गोड एक आठवण जिंजर कुकी जिंजर कुकी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अडीच मैदा अर्धा कप काकवी अर्थात मोलासीस अर्धा कप रूम temprature मधील बटर/ लोणी १ चमचा दालचिनी पूड २ चमचे सुंठ पूड अर्धा चमचा जायफळ पूड पाव चमचा लवंग पूड १ अंड चिमूट भर मीठ १ चमचा बेकिंग सोडा १ चमचा बेकिंग पावडर आणि आईसिंग साठी १ कप आईसिंग शुगर आणि २ चमचे दूध सर्वप्रथम एका खोलगट वाडग्यात मैदा , चेकिंग पावड...

Gingerbread Cookies Christmas Special Marathi Recipe

Image

काकवी | Kakvi | Molasses Marathi Recipe

Image
जत्रेच्या गुऱ्हाळात रसाच्या घाण्यावर गिर्हाईक यावे म्हणून आरोळ्या ठोकणारे तुम्हाला नक्कीच आठवत असतील. खुळ खुळ वाजणाऱ्या घ्याण्यावरचा पहिल्या धारेचा बर्फ नसलेला तो रस आपण आजही शहरातल्या पाणीदार रसाबरोबर मनोमन तुलना करतो,आणि उसासे सोडतो. याच गुऱ्हाळातला एक पदार्थ मात्र आपला ओळखीचा माणूस गुपचूप आजोबांकडे बाटलीत घालून द्यायचा काकवी तुमच्या आमच्या आठवणी आजही त्या बाटलीत बंद आहेत तर आज या काकवीची रेसिपी म्हणण्यापेक्षा एक आठवण तुमच्या बरोबर शेअर करतोय काकवी बनवण्यासाठी आपल्याला १ लिटर उसाचा बर्फ आणि लिंबू नसलेला रस आणि जत्रेतल्या काही आठवणी कुठलाही थोडंसं खोलगट भांडे घ्या आणि त्यात उसाचा रस माध्यम आचेवर तापवायला ठेवा उकळी फुटेल तसा रस चमच्याने हलवत रहा . काही वेळाने रस आतून घट्ट व्हायला सुरुवात होईल. तो चमच्याने सतत ढवळत रहा जेणेकरून उतू जाणार नाही. रस आतून आता छान घट्ट काकवी तयार झाली आहे आता या काकवीला थोडे थंड करून एखाद्या बाटलीत किंवा भांड्यात ओतून ठेवून द्या आणि हवी तेव्हा कुठल्याही गोडाच्या पदार्थात जिन्नस म्हणून वापरा किंवा डायरेक्ट खावा एक्दम मस्त लागते

काकवी/Kakvi Marathi Recipe

Image

काकवी/Kakvi Marathi Recipe

Image

काकवी/Kakvi Marathi Recipe

Image

*WARNING* Third Eye Opening Om Chanting use headphones

Image
https://www.youtube.com/watch?v=7l2hSvfC4Rs&feature=youtu.be take a movement and subscribe Being Spiritual use headphones in the beginning of the universe there was nothing but the sound everything begins with it and its OM' being spiritual taking opportunity to produce those soundwaves as it is #beingspiritual #MEDITATION #mindpeace #yoga #om