Gingerbread Cookies Christmas Special Marathi Recipe
आठवतात का तुम्हाला १० पैश्याची पाच, बारीक गोल बटणासारखी दिसणारी बिस्किटे,
नक्कीच खाल्ली असतील आणि चव अजूनही मनात खोलवर दडून बसली असणार .
आई बरोबर वाण्याच्या दुकानात सामान उचलायला जावं लागलं कि त्याचं बक्षीस असायची ती १० पैशाची बिस्कीट
अद्भुत आणि अपूर्व चवीच्या जिंजर कुकीज बनवल्या तेंव्हा कळलं नाही कि हि तीच बिस्कीट आहेत पण जेंव्हा चाखली
तेंव्हा झटकन अगदी बालपणात घेऊन गेली आणि ती आठवण डोळ्यावाटे वाहू लागली .
हो त्या जिंजर कुकीज च होत्या .
एरवी ख्रिसमस शिवाय याकडे कुणी ढुंकून हि पाहत नाही.
पण आज गर्वाने सांगते कि बालपणी आपण ती रोज खात होतो .
तर चला आज बनवायची आहे आणखीन एक गोड एक आठवण जिंजर कुकी
जिंजर कुकी बनवण्यासाठी आपल्याला लागेल
अडीच मैदा
अर्धा कप काकवी अर्थात मोलासीस
अर्धा कप रूम temprature मधील बटर/ लोणी
१ चमचा दालचिनी पूड
२ चमचे सुंठ पूड
अर्धा चमचा जायफळ पूड
पाव चमचा लवंग पूड १ अंड
चिमूट भर मीठ
१ चमचा बेकिंग सोडा
१ चमचा बेकिंग पावडर
आणि आईसिंग साठी
१ कप आईसिंग शुगर
आणि
२ चमचे दूध
सर्वप्रथम
एका खोलगट वाडग्यात मैदा , चेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ व सुंठ दालचिनी व लवंग पूड चालून घ्या
मग यात जायफळ पूड मिसळा
आणि whisk ने छान एक जीव करा व वेगळं ठेवून द्या
मग एका दुसऱ्या बाउल मध्ये अंड फोडून घ्या
व त्यात बटर मिसळा
आणि इलेक्ट्रिक बेटर च्या साहाय्याने फेटून घ्या
हे मिश्रण छान हलकं होई पर्यंत फेटत राहा
हळू हळू यात काकवी मिसळत राहा
सर्व छान एक जीव झाला
कि या मिश्रणात चालून घेतल्याला सुक्या पिठाचे मिश्रण मिसळा
व कालथ्याने छान एकजीव करा
आता हातानेच हे पीठ मळायला सुरुवात करा
याची घट्टसर कणिक मळून घ्या
यानंतर एक बटर पेपर घ्या व त्यावर मळलेलं हे पीठ ठेवा
व बटर पेपरच्या वेष्टनाने हे पीठ झाकून फ्रिज मध्ये ठेवून द्या
किमान एक तासा भरासाठी हे पीठ फ्रिज मध्ये राहूद्या
पारंपरिक पद्धतीत किमान ३ दिवसांपर्यंत हे पीठ मुरू देतात
एका तासानंतर हे पीठ बाहेर काढा
व याचे दोन सामान भाग करून वर बटर पेपर अंथरून यःची जाडसर पोळी लाटून घ्या
जर तुम्हाला कूकी कुरकुरीत हव्या असतील तर पोळी पातळ लाटा आणि जाड कुकीज साठी जाड पोळी लाटा
आता कुकी कटर च्या साहाय्याने कुकीज कापून घ्या
सर कुकीज बटर पेपर लावलेल्या बेकिंग ट्रे मध्ये थंड अंतर सोडून ठेवा व प्री हीट ओव्हन मध्ये १८० सेल्सियस वर ७ ते १० मिनिटासाठी बेक करून घ्या
१० मिनिटानंतर या कुकीज ओव्हन मधून बाहेर काढा आणि जाळीवर थंड करायला ठेवा
कुकीज थंड होई पर्यंत आपण बनवूया आईसिंग
त्यासाठी एका बाउल मध्ये १ कप आईसिंग शुगर किंवा पिठी साखर घ्या व त्यात २ चमचे दूध मिसळा आणि याची पेस्ट तयार करा तयार पेस्ट पिपिन्ग बॅग मध्ये भरा
व कुकीज ला आपल्या आवडी प्रमाणे सजवा
तयार झाल्या जीजेर कुकीज
ह्या जीजेर कुकीज हवा बंद बरणी मध्ये भरून ठेवा पण जर उरल्या तर
Gingerbread Cookies are some of the favorite cookies to be prepared for Christmas. The spices used and molasses give an amazing flavor and the aroma while baking is amazing. Kids really enjoy making them during the holiday season.
#gingercookies #gingerbreadcookies #christmascookies #cookiesinmarathi #biscuits
Comments
Post a Comment