काकवी | Kakvi | Molasses Marathi Recipe
जत्रेच्या गुऱ्हाळात रसाच्या घाण्यावर गिर्हाईक यावे म्हणून आरोळ्या ठोकणारे तुम्हाला नक्कीच आठवत असतील.
खुळ खुळ वाजणाऱ्या घ्याण्यावरचा पहिल्या धारेचा बर्फ नसलेला तो रस आपण आजही शहरातल्या पाणीदार रसाबरोबर मनोमन तुलना करतो,आणि उसासे सोडतो.
याच गुऱ्हाळातला एक पदार्थ मात्र आपला ओळखीचा माणूस गुपचूप आजोबांकडे बाटलीत घालून द्यायचा
काकवी
तुमच्या आमच्या आठवणी आजही त्या बाटलीत बंद आहेत
तर आज या काकवीची रेसिपी म्हणण्यापेक्षा एक आठवण तुमच्या बरोबर शेअर करतोय
काकवी बनवण्यासाठी आपल्याला १ लिटर उसाचा बर्फ आणि लिंबू नसलेला रस
आणि जत्रेतल्या काही आठवणी
कुठलाही थोडंसं खोलगट भांडे घ्या आणि त्यात उसाचा रस माध्यम आचेवर तापवायला ठेवा
उकळी फुटेल तसा रस चमच्याने हलवत रहा .
काही वेळाने रस आतून घट्ट व्हायला सुरुवात होईल. तो चमच्याने सतत ढवळत रहा
जेणेकरून उतू जाणार नाही.
रस आतून आता छान घट्ट काकवी तयार झाली आहे
आता या काकवीला थोडे थंड करून एखाद्या बाटलीत किंवा भांड्यात ओतून ठेवून द्या
आणि हवी तेव्हा कुठल्याही गोडाच्या पदार्थात जिन्नस म्हणून वापरा किंवा डायरेक्ट खावा
एक्दम मस्त लागते
Comments
Post a Comment