चिकन पहाडी कबाब | Pahadi Chicken Kebab Marathi Recipe
याला पहाडी टिक्का किंवा पहाडी कबाब का म्हणतात माहित नाही ,पण याची चव आणि हिरवा रंग
मस्तच . बनवायला फार सोपा आणि कमीत कमी जिन्नस टाकून बनवलेला पहाडी चिकन टिक्का
चला तर मग
पहाडी चिकन टिक्का बनवण्यासाठी आपल्याला लागेल
पाव किलो बोनलेस चिकन
एक वाटी कोथिंबीर
अर्धी वाटी पुदिना पुदिना
६ ते ७ हिरव्या मिरच्या
एक चमचा जिरे
आलं लसणाची पेस्ट
एक चमचा हळद
अर्धा लिंबू
चवीपुरते मीठ आणि गरजेनुसार तेल व बटर
सर्वप्रथम चिकन व्यवस्थित धुवून आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुकडे करून घ्या
मग त्यावर मीठ ,हळद,हिरवे वाटण,आले लसूण वाटण टाका ,आणि अर्धा लिंबू पिळून घ्या
मग ते मिश्रण चांगले एकजीव करा ,चिकन टिक्का या मसाल्यात चांगला घोळवून घ्या.
मग हे मिश्रण कमीत कमी ४ तास मुरू द्यात
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तंदूर लावून कोळसा चांगला पेटू द्यावा
मग तंदूर च्या सळया किंवा आजकाल बाजारात लाकडी skewer मिळतात तेघ्या
व चिकन चे तुकडे या सळया मधे खुपसून तंदूर मध्ये भाजायला ठेवा५ मिनिट प्रेहेत केलेल्या ओव्हन मध्ये तुम्ही हे कबाब १८० डिग्री सेल्सियस वर १५ ते १८ मिंट ग्रिल करू शकता
Preheat the oven at degrees 350F for 5 minutes and place the skewers in the oven. Leave to grill for about 15-18 minutes.
तंदूर मध्ये साधारण ७ ते १० मिनटात चिकन पहाडी कबाब तयार होईल
आता हा प्लेट मध्ये काढून घ्या आणि मस्त ताव मारा
Comments
Post a Comment