पत्थर का गोश्त।दगडी कबाब | Patthar Ka Gosht | Dagdi Kebab Marathi Recipe



निज़ाम शिकरीला गेला असताना त्याचा खानसामा जेवणाची भांडी न्यायला विसरला
आणि मग तेंव्हा त्याने निजामाला शिकारीचे मटण दगडावर भाजून खायला दिले होते
अशी एक कहाणी आहे.
उत्तर भारतात सुद्धा हां दगडावरचा कबाब फार प्रसिद्ध आहे त्याच्या वेगळ्या चवीसाठी।
मसाले सर्व तेच पण दगडावर भाजल्याने चव काहीतरी वेगळीच आणि मस्त लागते ,
तर आज खास तुमच्यासाठी being मराठी घेऊन आलय दगडी कबाब म्हणजे पत्थर का गोश्त आणि तेहि आपल्या घरात.
दगडी कबाब बनवण्यासाठी आपल्याला लागेल
पाव किलो बोनलेस मटण
दोन चमचे घाटी मसाला
अर्ध चमचा हळद
चवी पुरत मीठ
अर्ध लिंबू
चिरलेली कोथिंबीर
गरजेनुसार तेल
आणि एक दगडाची लादी

सर्व प्रथम वाहत्या पाण्यात मटण स्वच्छ धुऊन घ्या
धुतलेल्या मटणाचे पातळ काप करून घ्या
चिरलेले काप एका परातीत काढून घ्या
व मग यावर मीठ हळद घाटी मसाला लिंबाचा रस आणि कोथीमिर लावा आणि छान एकजीव करून घ्या
साधारणतः १/२ तास तरी मटणाचे हे तुकडे या मसाल्यात मुरू द्या
या नतर गॅस वर दगडाची लादी तापवयाला ठेवा
दगडाची लादी वर पाण्याचा हबका मारून त्याचे तापमान सेट करा
मग तापलेल्या लादीवर थोडं थोडं तेल पसरवून घ्या
आता मसाल्यातील कबाब एक एक करून लादी वर ठेवा
माध्यम याचे वर कबाब भाजू द्या
एखादी काडी किंवा सुरीच्या टोकदार भाग च्या मदतीने हे कबाब पलटी करा
दोन्ही अंगांनी कबाब छान खरपूस भाजून घ्या
गरज वाटल्यास थोडं थोडं तेल घाला
लक्षात ठेवा कि दगडाची हि लादी ६०० डिग्री सेल्सियस पर्यंत तापते
व तापलेली लादी लवकर थंड हि होत नाही
त्यामुळे कबाब तयार झाल्या नांतर हि लादीकमीतकमी अर्धा तास थंड होऊ द्या
तयार झाले दगडी कबाब



Comments